स्वत:च्या आमदारांचं भलं करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलीये, आधी गरीबांचा, मग आमदारांचा विचार करा" अशी टीका भाजप आमदार राम कदम यांनी केलीये..मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल विधानसभेत म्हाडाच्या घरांसाठी येणाऱ्या अडचणी दूर करणार. तसेच, ग्रामीण भागातील ३०० आमदारांसाठी मुंबईत घरे बांधण्यात येणार असल्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोशल माध्यमांवर ट्रोल झाले आहेत. त्यांच्या या निर्णयाला विरोध होत आहे.